कर्जमाफीतून या शेतकऱ्यांना वगळणार.. पहा हसन मुश्रीफ यांचा महत्वाचा खुलासा

Crop Loan Waiver : शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यात कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. ६ मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठे घडेल, अशी सर्वांना आशा आहे. मात्र, त्याआधीच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कर्जमाफीबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काही शेतकऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

वारंवार कर्जमाफी घेणाऱ्यांची यादी तपासणार?

मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार यावेळी कर्जमाफी करताना जुन्या कर्जमाफीच्या रेकॉर्ड्सची तपासणी करणार आहे.
(१) २००८ मधील केंद्र सरकारची (यूपीए) कर्जमाफी
(२) २०१७ मधील फडणवीस सरकारची कर्जमाफी
(३) २०१९ मधील ठाकरे सरकारची कर्जमाफी

जर एखाद्या शेतकऱ्याने या तिन्ही योजनांमध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला असेल आणि तरीही तो पुन्हा थकबाकीदार झाला असेल, तर अशा शेतकऱ्यांना यावेळी यादीतून वगळण्याचा विचार सरकार करत आहे. त्याऐवजी, जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आले आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही, त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

येथे वाचा – घाबरून सोयाबीन विकू नका, दरात तेजी येण्याची शक्यता.. बाजारातील ही ४ कारणे नक्की वाचा

जून २०२५ की २०२६? तारीख नक्की कोणती?

अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की जून २०२६ पर्यंतचे कर्ज माफ होईल. पण हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे की, हा गैरसमज दूर करा. सध्या जून २०२५ पर्यंतची थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे.

येथे वाचा – महिलांनो! नवीन GR आला.. जानेवारीचा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काय?

ज्या शेतकऱ्यांनी इमानदारीने कर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकार त्यांनाही जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा देता येईल, यावर काम करत आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group