रेशन कार्डसाठी ही लोकं अपात्र ठरणार.. अपात्र लोकांची यादी प्रसिद्ध

Ration Card Ineligible List 2026 : मोफत किंवा सवलतीच्या दरात रेशन घेणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डच्या नियमांमध्ये शासनाकडून मोठे आणि कडक बदल केले जाणार आहेत. या नव्या नियमांनुसार अनेक बोगस आणि सधन लाभार्थी रेशन कार्डसाठी थेट अपात्र ठरणार आहेत. शासनाने अपात्र लोकांचे निकष स्पष्ट केले असून, या कारवाईसाठी बाह्य यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे.

शासनाने उचलले कडक पाऊल

सध्या अनेक असे सधन लोक आणि काही घुसखोर नागरिक (उदा. बांगलादेशी) बेकायदेशीरपणे गरिबांच्या रेशनवर डल्ला मारत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे खऱ्या गरजूंना लाभ मिळावा यासाठी सरकारने बाह्य यंत्रणेद्वारे (External Agencies) सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण ठरणार अपात्र? (अपात्र लोकांची यादी)

शासनाने निश्चित केलेल्या नव्या निकषांनुसार खालील नागरिक रेशनसाठी अपात्र ठरणार आहेत:
उत्पन्न मर्यादा: ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात २ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि शहरी भागात ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
आयकरदाते (Income Tax Payers): जे नागरिक शासनाला नियमितपणे इन्कम टॅक्स भरतात.
वाहने आणि उपकरणे: ज्यांच्याकडे स्वतःचे चारचाकी वाहन आहे, घरात एसी (AC) आहे किंवा ५ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचा जनरेटर आहे.
मालमत्ता आणि घरे: रेशन कार्ड धारकाच्या नावावर १०० चौरस मीटरपेक्षा मोठे पक्के घर, फ्लॅट किंवा स्वतःचा प्लॉट असल्यास. तसेच, शहरात ८० चौरस मीटरपेक्षा मोठी व्यावसायिक जागा किंवा गाळा असणारे नागरिक.

येथे वाचा – खुशखबर! अतिवृष्टी भरपाई वाटप सुरू.. या जिल्ह्यांना मदत जाहीर

‘गिव्ह इट अप’ आणि कडक कारवाईचा इशारा

शासनाने सधन नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःहून ‘गिव्ह इट अप’ (Give it Up) मोहिमेअंतर्गत आपले रेशन कार्ड प्रशासनाकडे जमा (Surrender) करावे. आर्थिक स्थिती लपवून किंवा खोटी माहिती देऊन रेशन घेताना कोणी चौकशीत दोषी आढळल्यास, केवळ त्याचे रेशन कार्डच रद्द होणार नाही; तर आजवर त्याने घेतलेल्या सर्व धान्याच्या रकमेची त्याच्याकडून कडक वसुली केली जाईल व कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

येथे वाचा – खरीप पीक विमा २०२५ वाटपाला अखेर मुहूर्त? कृषिमंत्र्यांचे तातडीचे आदेश

३१ मार्च २०२६ पर्यंत ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक

ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी केलेली नाही, त्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास, केवायसी होईपर्यंत त्या लाभार्थ्यांचे रेशन तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे बंद केले जाईल.
गरजूंना त्यांचा हक्क मिळावा आणि बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा, या उद्देशाने प्रशासनाने ही कडक पावले उचलली आहेत.

Leave a Comment

Join WhatsApp Group